killed attack
पुणे - फटाके वाजवताना झालेल्या वादातून हडपसरमधील रामटेकडी भागात दोन गटात झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.