Amit Chavan
sakal
वेल्हे, (पुणे) - पानशेत (ता. राजगड) येथील स्मशानभूमीजवळ दारूच्या नशेत पाण्यात उतरलेल्या २८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता. 27) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात रात्री उशिरा घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.