End Life
sakal
पुणे - शहरात एकाच दिवशी तरुणासह विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आर्थिक विवंचनेमुळे नारायण पेठेत गळफास घेतला. तर अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने कात्रजमध्ये इमारतीच्या १० मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले.