गिझरमधून तयार झालेल्या वायूमुळे तरुणाचा गुदमरून मृत्यू

Young man dies due to gas produced by geyser in Pune
Young man dies due to gas produced by geyser in Pune

पुणे : गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या वायूमुळे 30 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये बुधवारी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा आणि बाथरूमचा दरवाजा तोडून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या बाबत कोथरूड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामराजे किशोर संकपाळ (वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडील बाहेरगावी असल्याने तो एकटाच फ्लॅटमध्ये राहत होता. तो घरातच लहान मुलांची ट्यूशन (शिकवणी) घेत. गेले तीन ते चार दिवसांपासून फ्लॅटचा बंद होता. हा तरुण घरीच क्‍लास घेत असल्याने क्‍लाससाठी येणारे विद्यार्थी रविवारपासून घरी येऊन दार वाजवून जात होते. पण दार बंदच होते मंगळवारी संध्याकाळी एका विद्यार्थ्याने सर दरवाजा उघडत नसल्याचे सोसायटीमधील काही नागरिकांना सांगितली. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्याने येथील नागरिकांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

मोदींचा 'तो' निर्णय आत्मघातकीच : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप

या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने फ्लॅटचा बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. बाथरूमचा दरवाजा तोडल्यानंतर संपकाळ बेशुद्ध अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला ससूनमध्ये नेले असता डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

फुल विक्रेत्याच्या खात्यात जमा झाले 30 कोटी रुपये; अन्...

यापूर्वी ही घडल्या दोन घटना
गॅस गिझरमधून तयार झालेल्या वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. गॅस गिझरमधून बाहेर पडलेल्या विषारी वायूमुळे गेल्या महिन्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. मुंबई येथे ही दुर्घटना उघडकीस आली होती. कोथरूड परिसरातील संगम चौकाजवळ असलेल्या संगम सोसायटीमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com