कुरकुंभ : विजेच्या धक्का बसून तरुणाचा मृत्यू

सावता नवले
Sunday, 10 January 2021

कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वीजेच्या धक्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी  (ता. 9) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वीजेच्या धक्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी  ( ता. 9 ) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक डि 5 मधील हार्मोनी ऑरगॅनिक कंपनीत विजेचा धक्याने तुषार विजय पाळेकर ( वय. 19 वर्षे, रा. कोकणे वस्ती , नंदादेवी ता. दौंड जि. पुणे ) या तरूण कामगाराचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हार्मोनी  कंपनीत वाहन पार्किंग साठीचे सिमेंट काँक्रिट पीसीसी सपाटीकरण करण्याचे काम यंत्राने चालू असताना त्या यंत्राची वायर कट होऊन विजेचा धक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात निखिल शंकर टेळे (रा. मुंबई) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अपघातस्थळी दौंडचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार मारूती हिरवे करीत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man dies of electric shock