पिंपळवंडी - कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी (ता. २५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील राजेश रमेश काकडे (वय-३२) हा तरुण मृत्युमुखी पडला.
राजेश हा त्याच्या स्वतःच्या दुचाकीवरून आळेफाट्यावरून ओतुरच्या दिशेने जात असताना पिंपरी पेंढार गावच्या हद्दीत आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने समोरून आलेल्या कारला धडकला. धडक जोरात बसल्याने राजेशचा जागीच मृत्यु झाला.
अपघाताची माहिती समजल्यानंतर ओतुर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. कल्याण अहिल्यानगर या महामार्गावर सिमेंट रस्त्याचे काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. कमी जागेतून एकेरी दोन्ही बाजूने वाहतूक होत असल्याने अपघात होत असुन लवकरात लवकर या रस्त्याचे काम पुर्ण व्हावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
या पुर्वी सुद्धा या रस्त्याच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मृत्यु येथे झालेले आहेत. पिंपळवंडी येथे शोकाकुल वातावरणात राजेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.राजेशच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण असा परिवार आहे. पिंपळवंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य नितेश काकडे यांनी ओतूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.