तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) भीमाशेत येथील कामगार भीमराव लक्ष्मण चेरले (वय ३०, मूळगाव शिरशी, ता. कंधार, जि. नांदेड) हे गणेश विसर्जन करण्यासाठी भीमा नदीत गेले असता पाण्यात बुडाले आहेत. .अमोल कापरे, निलेश कापरे, अतुल शिंदे, प्रथमेश भुजबळ, विष्णु भुजबळ, अभिषेक भुजबळ, रोहन भुजबळ, जय भुजबळ या स्थानिक तरुणांनी तातडीने पोलिसांना कळवून शोध मोहीम सुरू केली. परंतु पाण्याच्या प्रवाहाबरोबर भीमराव हे वाहून गेले..अग्निशमन दल, शिक्रापूर पोलीस, आपदा मित्र व स्थानिक ग्रामस्थांतर्फे युद्ध पातळीवर शोध मोहीम चालू असून अद्याप भीमरावचा शोध लागलेला नाही. तळेगाव ढमढेरे ( भीमाशेत) येथील बोरा फार्म जवळ भिमा नदीत गणपती विसर्जनासाठी शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून, भीमराव लक्ष्मण चेरले असे पाण्यात बुडालेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. .शनिवारी आणि रविवारी अथक परिश्रम करून पीएमआरडीएचे अग्निशमन पथक भीमा नदीच्या पाण्यात भीमरावचा शोध घेत असून अद्याप शोध लागलेला नाही. भीमानदीच्या पाण्यात अर्जुन राठोड व भीमराव चेरले हे दोघे गणपती घेऊन पाण्यात गेले परंतु भीमरावला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. .Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीने मोडला रेकॉर्ड, २९ तासांनंतरही सुरू, पोलिसांचे नियोजन कोलमडले .यावेळी नागरिकांनी आरडाओरडा केल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, संदीप इधाते, पुणे महानगर विकास प्राधिकरण अग्निशमन दलाचे उमेश फाळके, शुभम चौधरी, राजू फुंदे, शुभम बढे, दिग्विजय नलावडे, सागर जानकर, ज्ञानेश्वर भोर तसेच अपदा मित्र वैभव निकाळजे, शेरखान शेख, गणेश टिळेकर, महेश साबळे, शुभम वाघ, राहुल गायकवाड आदींनी घटनास्थळी जाऊन रात्रीच्या वेळी शोध मोहीम सुरू केली. परंतु रात्री शोध मोहिमेस अडथळा आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी पुन्हा पथकाने शोध मोहीम सुरू केली परंतु भीमरावचा शोध उशिरापर्यंत लागलेला नसल्याचे पोलीस हवालदार किशोर तेलंग यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.