

Pune Accident
sakal
मांजरी : वाघोली रस्त्यावर सिरम कंपनीसमोर मिनी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र मनोहर अण्णा रणसिंग (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) हा जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शनिवारी (ता. १७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.