लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाची स्वत:च्या हाताने गळा चिरून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे घडली.

लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाची स्वत:च्या हाताने गळा चिरून आत्महत्या

धायरी - लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे घडली आहे. महेश राजाराम तवंडे (वय 32, फ्लॅट नं 19,ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी नैराश्यातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महेश हा त्याच्या मैत्रिणीसोबत धायरी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. काल त्याची मैत्रीण बाहेरगावी गेलेली असताना त्याने फ्लॅट आतून बंद करुन स्वतःच्याच हाताने शरीरावर व गळ्यावर वार केले. दुपारी घरमालकाला ओरडण्याचा आवाज आला होता परंतु नेहमीच या तरुणाच्या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत असल्याने त्यांनी दुर्लक्ष केले. रात्री घरमालकाला संशय आल्याने त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली.

याबाबत माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव व इतर पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आतून बंद असलेला फ्लॅटचा दरवाजा तोडला असता महेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून सिंहगड रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Young Man Living In Live And Relationship Committed Suicide By Slitting His Throat With His Own Hands

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RelationsthroatYoung Man