esakal | 'ते' कालव्याजवळ दारू...अचानक त्यांचा वाद...अन् मग त्यांनी त्याला ढकलले कालव्यात...
sakal

बोलून बातमी शोधा

jail.jpg

एम्प्रेस गार्डन येथील डाव्या कालव्याजवळ दारू पित बसलेल्या काही जणांनी किरकोळ कारणावरुन एका तरुणाचा खून  केला.

'ते' कालव्याजवळ दारू...अचानक त्यांचा वाद...अन् मग त्यांनी त्याला ढकलले कालव्यात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : एम्प्रेस गार्डन येथील डाव्या कालव्याजवळ दारू पित बसलेल्या काही जणांनी किरकोळ कारणावरुन एका तरुणाचा खून करुन त्यास कालव्यातील पाण्यात ढकलुन दिले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दरम्यान, मुलीच्या छेडछाडीवरुन खूनाचा प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आयान (पूर्ण नाव समजु शकले नाही) असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयान व त्याचे मित्र एम्प्रेस गार्डनजवळ असलेल्या कालव्याजवळ दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली. यावेळी त्याच्या साथीदारानी त्यास बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी त्यास कालव्यात ढकलून दिले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

loading image
go to top