पुणे - दुबई-अबूधाबी येथे नोकरी करणारा तरुण दिल्लीला येत असताना पुणे विमानतळावर उतरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून तरुणाचा शोध घेण्याची विनंती केली आहे..मो. फैसल (रा. मोहल्ला कोटरा, ता. शेरकोट, जि. बिजनौर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ मो. अफजल हा दुबई-अबूधाबी येथे नोकरीसाठी राहत होता. ३० जुलै २०२६ रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-284 या विमानाने दिल्लीला येण्यासाठी त्याने बुकिंग केले होते. रात्री ११.१५ वाजता विमान दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते..मात्र, अफजल दिल्लीला पोहोचला नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्याच्याबाबत माहिती घेतल्यानंतर तो पुणे विमानतळावर उतरल्याचे समोर आले. त्यानंतर पुणे विमानतळावरही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच विविध ठिकाणी चौकशी केली; मात्र अफजबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही..अफजलचा मोबाइल क्रमांकही तक्रारीत नमूद करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी विमाननगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसां कडून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.