esakal | लसीकरणासाठी तरुणांची होतेय धडपड; नागरिकांमध्ये नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

लसीकरणासाठी तरुणांची होतेय धडपड; नागरिकांमध्ये नाराजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मी येरवडा (Yerwada) येथे राहतो... लसीकरणासाठी (Vaccination) नोंदणी (Registration) केली.... केंद्र मिळाले औध (Aundh) येथील. केंद्रावर आले तर लस (Vaccine) संपलेली, उद्या या असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले... संगीता सांगत होती. तिच्यासारखेच रमेश, शौर्य, वरद अन्‌ आणखी अशा कितीतरी युवकांची ही व्यथा. (Young people struggle for vaccination Dissatisfaction among citizens)

लसीचा साठा कमी.. लसीकरणासाठी केंद्र कमी आणि लस घेण्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांची संख्या मोठी. सध्या अशा प्रकारे १८ ते ४४ वयोगटातील युवक-युवती आणि नागरिकांच्या लसीकरणामध्ये गोंधळ सुरू आहे. रांगेत येऊन थांबायचे. नंबर आला, तर लस मिळते. उशीर झाला, तर वेळ तर जातोच, पण लसही मिळत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. ही परिस्थिती कधी सुधारणार, असा प्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. पहिल्या डोस घेण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि अन्‌ तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी महापालिकेने पाच केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर पुरेशी लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावे लागत आहे. केंद्र कमी आणि गर्दी जास्त असल्यामुळे अनेकदा सकाळपासून नंबर लावून निराश होऊन लस न घेता घरी जावे लागत आहे.

हेही वाचा: कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही

बुधवारी केंद्रावर आलो होतो. गर्दी पाहून परत गेलो. आज सकाळीच रांगेत येऊन थांबलो. दीड तासानंतर लस मिळाली. परंतु, माझ्या मित्रांना येण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांना लस मिळाली नाही. रांगेत थांबून परत जावे लागले.

- सचिन धांडे, औंध

रांगेत थांबूनही लस मिळाली नाही. त्यामुळे आता पुन्हा उद्या केंद्रांवर यावे लागणार आहे. उद्या तरी लस मिळेल का, अशी विचारणा केल्यानंतर उद्या येऊन जा, लस आली तर मिळेल, असे सांगण्यात आले. रोज फेऱ्या मारणे शक्य नाही आणि योग्य माहिती कोणीही देत नाही.

- रश्‍मी कऱ्हाडे, कोथरूड

लसीकरणासाठी प्रचंड गर्दी होती. दिलेल्या स्लॉटनुसार आम्हाला उभे केले होते. सेंटरवर तांत्रिक अडचण येत होती. केंद्रावरही समन्वयाचा अभाव होतो. परंतु, अशा परिस्थितीमध्ये थांबल्यानंतर अखेर लस मिळाली.

- अभिषेक चौधरी, बावधन

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा