
पुणे : लॉकडाउनच्या काळात पुणे व मुंबईमधून ग्रामीण भागात तरुणांचा मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू झाला आहे. या तरुणांना भविष्यात ग्रामीण भागातच रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या संधी कशा उपलब्ध होतील, याचे नियोजन कौशल्य विकास विभागाने करावे. त्यासाठीचा प्रस्ताव कौशल्य विकास विभागाने तयार करून सादर करावा, अशा सूचना कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या आहेत.
लॉकडाउनमुळे अनेक मजूर गावी अडकले आहेत. त्यांना त्यांच्याच गावी रोजगाराची सोय उपलब्ध करून द्यावी, असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री देसाई यांनी हे आदेश दिले आहेत. डोंगराळ, दुर्गम व आदिवासी भागातील शेती व शेती व्यवसायाशी निगडीत प्रकल्पांना चालना देऊन या तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करण्यासाठीचा दिशादर्शक प्रस्ताव कौशल्य विकास विभागाने तयार करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस विभागांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच वित्त विभाग, कौशल्य विकास विभाग, जीएसटी विभाग या विभागांचा आढावा देसाई यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. लॉकडाउनमुळे परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत. बहुतेक कंपन्या या ग्रामीण भागात आहेत. अनेक कंपन्यांमध्ये आवश्यक ते मजूर उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी येत आहेत. यापार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांना व्यवसायासाठीचे मार्गदर्शन सुध्दा गरजेचे आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा.
लॉकडाउनच्या परिस्थितीत रोजगार आणि व्यवसायासाठीचे प्रशिक्षण ऑनलाइन पध्दतीने देण्यात यावे, यासाठीचा आराखडा कौशल्य विकास विभागाने सादर करावा, अशा सूचना देसाई यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या विभागाचा आढावा सादर केला. पोलिस विभागाच्या कामकाजाबद्दल गृहराज्यमंत्री देसाई यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस कौशल्य विकास विभागाचे संचालक शरद आंगणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.