

Accident
sakal
दावडी - राजगुरुनगर येथून कपडे खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना राक्षेवाडी (ता. खेड) येथे एसटी बसने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. या अपघातात बसच्या चाकाखाली आल्याने सोनाली रोहिदास कुळेकर (वय-२२, रा. राक्षेवाडी, ता. खेड) या तरुणीचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक अजित श्रीपती दोरे (वय २८, रा. राक्षेवाडी) हे जखमी झाले आहेत. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सातच्या सुमारास राक्षेवाडी-गुळाणी रस्त्यावर भांबुरे डेअरीजवळ हा अपघात झाला.