दुचाकीस्वाराने तरुणीवर केला धारदार शस्त्राने वार, अन्...

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रस्त्याने पायी जाणाऱ्या तरूणीवर दुचाकीवरून आलेल्या तरूणाने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तरूणीचा मृत्यू झाला.

पिंपरी, ता. 1 : रस्त्याने पायी जाणाऱ्या तरूणीवर दुचाकीवरून आलेल्या तरूणाने धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तरूणीचा मृत्यू झाला. चिखलीतील शिवतेजनगर येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरूणीवर हल्ला केल्यानंतर तरूणाने स्वत:वरही वार करून घेतले आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा निर्णय मुंबईतल्या बैठकीत

मृत तरूणी शनिवारी (ता. 1) दुपारी दीडच्या सुमारास चिखली, शिवतेजनगर येथील तिरंगा चौकातील रस्त्यालगतच्या पदपथावरून जात होती. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तरूणाने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला. यामुळे ती तरूणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर तरूणाने स्वत:वरही वार करुन घेतले. परिसरातील नागरिकांनी दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तरूणीचा मृत्यू झाला. तर तरूणावर उपचार सुरू आहेत. भररस्त्यात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून याठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young woman was stabbed to death with a sharp weapon

टॅग्स
टॉपिकस