पुणे - बिबवेवाडी परिसरात एका भावाने आपल्या लहान भावाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ‘सतत दारू पितो, कामधंदा करत नाही आणि त्रास देतो’ या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.