Good Health : तरुणांनो, सुदृढ रहायचेय, तर तृणधान्ये खा - मानखेडकर

नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक मानखेडकर यांचे आवाहन
Youngsters to be healthy eat cereals Mankhedkar nutrition food health
Youngsters to be healthy eat cereals Mankhedkar nutrition food healthsakal

पुणे : तृणधान्य ही सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहार म्हणून काम करत आहेत. यापैकी बहुतांशी तृणधान्य ही महाराष्ट्रात उत्पादित होणारी आहेत. या तृणधान्यांचा दैनंदिन आहारात वापर म्हणजे निरोगी, व सुदृढ आरोग्यासाठी मिळणारी देणगी आहे. आजच्या फास्ट फुडच्या जमान्यात तृणधान्यांचा आहारातील वापर कमी होऊ लागली आहे.

परिणामी युवकांना तरुण वयातच विविध आजारांनी ग्रासले जात असून, यामुळे आयुर्मान कमी होऊ लागले आहे. त्यामुळे तरुणांनो, सुदृढ रहायचेय, तर रोज नियमितपणे तृणधान्य खा, असे आवाहन केंद्रीय खेल क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेल्या नेहरू युवा केंद्राचे राज्याचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी गुरुवारी (ता.८) येथे महाविद्यालयीन युवक-युवतींना मार्गदर्शन करताना केले.

नेहरू युवा केंद्र आणि वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय आणि हौसाबाई सोपानराव कामठे कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय तृणधान्य जनजागृती कार्यक्रम, करिअर व व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात महाविद्यालयीन युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे, प्राचार्य भानुदास रिठे, समन्वयक प्रा. मीरा सांगळे, नेहरू युवा केंद्राच्या युवक कल्याण विभागाच्या संपर्कप्रमुख राजश्री माने आदी उपस्थित होते.

Youngsters to be healthy eat cereals Mankhedkar nutrition food health
Pune Lok Sabha Election : मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ

मानखेडकर पुढे म्हणाले, ‘‘संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यानुसार केंद्र सरकारच्या वतीने देशभरात तृणधान्यांचा आहारात वापर वाढविण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नेहरू युवा केंद्राच्यावतीने राज्यभर याबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

या जनजागृतीसाठी राज्यभर जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर तृणधान्य जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे, वरई, भगर आदींचा समावेश आहे.’’ यावेळी मानखेडकर यांनी युवकांसाठी नेहरू युवा केंद्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

Youngsters to be healthy eat cereals Mankhedkar nutrition food health
Pune : बाभळेश्वर - कडुस विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने शेतीच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सकस, शुद्ध, प्रथिने व खनिजयुक्त तृणधान्यांचे उत्पादन होत असते.

शेती हा महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी तरुणांनी शेती उद्योगाकडे वळावे. शेतीत पिकणाऱ्या तृणधान्यांचा दैनंदिन आहारात वापर करावा, असा सल्ला वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी दिला. प्राचार्य भानुदास रिठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मीरा सांगळे, राजश्री माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. शंकर बांगर यांनी सूत्रसंचालन केले.

नेहरू युवा केंद्राच्या युवकांसाठी योजना

- युवा संसदेच्या माध्यमातून युवकांचे नेतृत्व विकसित करणे

- युवकांचा कौशल्य विकास करणे

- युवकांना करिअर व व्यवसाय मार्गदर्शन करणे

- युवकांच्या विचारांचे आदान-प्रदान करणे

- युवकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रासाठी पाठ्यवृत्ती देणे

- ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देणे

- पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विविध उपक्रम राबविणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com