Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

police crackdown on illegal arms India case details: जुन्नरमध्ये विक्रीसाठी तलवारी-खंजीर घेऊन निघालेल्या तरुणाला नारायणगावात सापळा रचून अटक; ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त, १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Youth Held with Illegal Weapons in Narayangaon, Police Seize Swords

Youth Held with Illegal Weapons in Narayangaon, Police Seize Swords

esakal

Updated on

-रवींद्र पाटे

नारायणगाव: जुन्नर येथे तलवारी व खंजीर या शस्त्रांची विक्री करण्यासाठी निघालेल्या तरुणाला पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नारायणगाव येथे सापळा रचून मुद्देमालासह अटक केली. आरोपीकडून दहा तलवारी व दोन खंजीर, मोटार असा सुमारे 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयाने 1 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com