esakal | गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक | Junnar
sakal

बोलून बातमी शोधा

गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक

Junnar : गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : (दत्ता म्हसकर)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्याकडून वाहनास चार लाख ७४ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ७४ हजार ८४० रुपये किमतीचा गुटखा व चार लाखाच्या नवीन गाडीचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी दिली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा व अन्य अमली पदार्थाच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी खास मोहीम राबविण्याचा आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिला होता.त्यानुसार आज शनिवार ता. ०९ रोजी पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखा पथक खेड जुन्नर विभागात गस्त करत असताना सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार एकनाथवाडी ता. जुन्नर येथील सिबाका हॉटेलजवळ एक संशयित इसम गुटखा व पानमसाला बाळगून त्याची वाहतूक करत असल्याचे समजले.

हेही वाचा: सिंधुदुर्ग किल्ला शिवरायांनी बांधला, नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव,सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे,पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकिर, नाईक संदीप वारे,पोलिस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे, जुन्नरचे पोलिस कर्मचारी शंकर तळपे,गणेश जोरी यांच्या पथकाने छापा टाकला असता त्यांना मनोज बाळशीराम वाणी, वय २९, रा.पिंपळगाव तर्फे नारायणगाव ता.जुन्नर हा वाहन क्र.एम एच १४ जे एल ०४२२ या नव्या चारचाकीत बसलेला आढळून आला. त्यांचेकडे वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आणि पानमसाला मोठ्या प्रमाणात मिळून आला.त्याचेकडील गुटखा, पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्यास जुन्नर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

loading image
go to top