esakal | सिंधुदुर्ग किल्ला शिवरायांनी बांधला, नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

सिंधुदुर्ग किल्ला शिवरायांनी बांधला, नाहीतर...; मुख्यमंत्र्यांचा राणेंना टोला

sakal_logo
By
अमित उजागरे

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणावर पलटवार केला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला नाहीतर काहीजण म्हणतील तो आम्हीच बांधला, अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टीकास्त्र सोडलं.

सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे ऑनलाईन उपस्थित होते.

हेही वाचा: मुख्यमंत्री माझ्या कानात काही बोलले, मी एक शब्द ऐकला - नारायण राणे

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना राणे समर्थकांनी अचानक घोषणाबाजी सुरु केली. यानंतर काही क्षण आपलं भाषण थांबवत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, "आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी मी खास तुमचं अभिनंदन करतो कारण तुम्ही इतकं लाबं राहुन सुद्धा मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा आणि मातेचा एक संस्कार असतो मातीच्या वेदना काहीवेळा मातीत जाणे. कारण या मातीत अनेक झाडं उगवतात काही बाभळीची असतात तर काही आंब्याची असतात. आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करु, अशा शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

"माझ्यासाठी हा मोठ्या सौभ्याग्याचा दिवस आहे. कारण शिवसेना आणि कोकण हे नातं काही मी तुम्हाला सांगायला नको. मी अनेकदा म्हटलंय की कुठेही न झुकणारं मस्तक हे या सिंधुदुर्गवासियांच्यासमोर नतमस्तक झालं ते म्हणजे शिवसेनाप्रमुख! कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आजचा हा महत्वाचा दिवस आहे. कोकणचं आणि महाराष्ट्राच वैभव आपण आज जगापुढे नेत आहोत. पर्यटन म्हटल्यानंतर आपल्यासमोर शेजारील राज्य गोवा याच्याशी तुलना होते आपलंही वैभव कमी नाही. एवढी वर्षे विमानतळाला का लागली आणि हे सरकार आल्यावर ते मार्गी कसं लावगलं. काही जणं म्हटले होते की, कोकणाला कॅलिफोर्निया करु तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं मी कोकण उभं करेन. आदित्यनं बाकी गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीनं बोलणं वेगळं, मळमळीनं बोलणं आणखी वेगळं असतं" अा खोचक टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी राणेंना लगावला.

हेही वाचा: अखेर राणेंचा उद्धव ठाकरेंसमोर प्रहार! पहिल्यांदाच आमनेसामने

"महाराष्ट्रातील किल्ल्यांबाबत कोणीतरी माहिती द्यावी, माझा समज असा आहे की किमान सिंधुदुर्ग किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला. तर किल्ले आहेत, निळशार पाणी आहे, हे सगळं मी फोटोग्राफीनिमित्त पाहिलं आहे."

कोकणाच्या विकासानं आजपासून भरारी घेतली आहे. त्याची खरी सुरुवात आजपासून झालेली आहे. नारायणराव आपणं म्हणालात ते खरं आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. कोकणची भूमी शांत आहे म्हणून ती कमकुवत नाही. तर तिनं अनेक वर्षे भरभक्कम आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे. विनायक राऊत इथे निवडून आलेले खासदार आहेत त्यामुळे मला त्यांचा अभिमान आहे. बाळासाहेबांना खोटं बोललेलं अवडत नाही त्यामुळे त्यांनी अशा लोकांना शिवसेनेतून काढून टाकलं होतं. लघु किंवा सुक्ष्म खातं तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग तुम्ही महाराष्ट्रासाठी करुन द्यालं अशी आम्हाला अपेक्षा आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

loading image
go to top