व्याजाच्या वादातून तरुणास मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - व्याजाने घेतलेले पैसे देऊनही पुन्हा पैशांची मागणी करत दोघांनी तरुणास बेदम मारहाण केली. धनकवडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेस पोलिसांनी अटक केली. 

पुणे - व्याजाने घेतलेले पैसे देऊनही पुन्हा पैशांची मागणी करत दोघांनी तरुणास बेदम मारहाण केली. धनकवडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका महिलेस पोलिसांनी अटक केली. 

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सविता गायकवाड (वय 39, रा. माळवाडी, हडपसर) हीस अटक केली आहे. महिलेचे साथीदार समीर खेडेकर व सागर बडदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील माळवाडी परिसरात गायकवाड बेकायदा सावकारी करते. फिर्यादीने तिच्याकडून काही दिवसांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. या पैशांची त्यांनी परतफेडही केली. तरीही गायकवाडकडून पैशांची मागणी केली जात होती. 

दरम्यान, गायकवाड हिने खेडेकर व बडदे यांच्यासमवेत सोमवारी रात्री फिर्यादी यांच्या घरी जाऊन पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास फिर्यादीच्या मुलास जिवे मारण्याची धमकी दिली. खेडेकर व बडदे यांनी मुलाला मोहननगर भागातील एका मैदानावर नेऊन, त्यास चामडी पट्ट्याने जबर मारहाण केली, असे फिर्यादित म्हटले आहे. 

Web Title: youth beat for money