पुणे - प्रेमसंबंधाच्या संशयातून एका सहाय्यक व्यवस्थापक तरुणाला बंदुकीचा धाक दाखवून पट्टा व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार करणार आहे, तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकीही तरुणाला देण्यात आली.