पुणे : लग्नाच्या वरातीपूर्वीच निघाली त्याची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सुखी संसाराची स्वप्न पाहत नुकताच त्याचा साखरपुडा झाला... त्यानंतर ताप आल्याचे निमित्त झाले आणि लग्नाची वरात दारात येण्याआधीच त्याच्या मृत्यूची बातमी गावात आली... त्यामुळे या तरुणाच्या वरातीऐवजी अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग वाल्हे (ता. पुरंदर) येथील एका कुटुंबीयांवर आला...​

वाल्हे - सुखी संसाराची स्वप्न पाहत नुकताच त्याचा साखरपुडा झाला... त्यानंतर ताप आल्याचे निमित्त झाले आणि लग्नाची वरात दारात येण्याआधीच त्याच्या मृत्यूची बातमी गावात आली... त्यामुळे या तरुणाच्या वरातीऐवजी अंत्ययात्रा काढण्याचा दुर्दैवी प्रसंग वाल्हे (ता. पुरंदर) येथील एका कुटुंबीयांवर आला... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमोल संजय लंबाते (वय २१) याचा २० डिसेंबर रोजी साखरपुडा झाला होता. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी अमोल यास ताप आल्याचे निमित्त झाले. त्यामुळे त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वीस दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्याला सोमवारी (ता. १३) मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्या ठिकाणच्या रुग्णालयात देखील त्याच्या शरीराने उपचारास प्रतिसाद न दिल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे लग्नानंतरची सुखी संसाराची स्वप्ने पाहणारा अमोल इहलोकीची यात्रा संपवून निघून गेला.

अमोलच्या मृत्यूची बातमी मंगळवारी (ता. १४) गावात येऊन धडकल्यानंतर लंबाते कुटुंबीयांसह सगळा गाव दु:खाने हळहळला. परिसरातील दुकानांमध्ये कागदी व कापडी कॅरिबॅग विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमोलच्या पश्‍चात त्याची आई, लहान भाऊ व बहीण दुःखात बुडून गेले. सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth death before marriage by sickness