जिसका कोई नही उसका खुदा है यारो... 

uruli1.jpg
uruli1.jpg

लोणी काळभोर (पुणे) : गावी जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेने पुण्याहुन भरउन्हात पायी चालत तीनशेहुन अधिक परप्रांतीय कामगार उरुळी कांचन येथील रेल्वे स्थानकावर शनिवारी (ता. ९) जमा झाले. परराज्यात जाण्यासाठी एकही रेल्वे गाडी सुटणार नसल्याचे समजताच, भुकेने व्याकुळ  झालेल्या सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली.  त्यातच सकाळपासुन पोटात अन्नाचा कण गेला नसल्याने रडणारी लहान मुले व पायी चालुन थकलेल्या सोबतच्या महिलांना पाहून सर्वच कामगारांचे चेहरे चिंताग्रस्त झाले. 

त्याचवेळी लोणी काळभोर पोलिस व उरुळी कांचन येथील सागर कांचन व त्यांचे सहकारी परप्रांतीय कामगारांच्या सेवेसाठी देवासारखे धावून आले. लोणी काळभोर पोलिस व सागर कांचन व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांनाच भरपेट जेवण तर दिलेच. त्याही पुढे जाऊन तिनशेपैकी सव्वाशे कामगारांना पुन्हा पुण्यात हव्या त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी चार खाजगी वाहनेही उपलब्ध करुन दिली. 

उरुळी कांचनहून मुळगावी जाण्यासाठी रेल्वे मिळेल या आशेने शनिवारी (ता. ९) सायंकाळी उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर अचानक पुण्याहुन पायी चालत आलेले तीनशेहुन अधिक परप्रांतीय कामगार जमा झाले. मात्र परराज्यात जाण्यासाठी उरुळी कांचनहुन एकही रेल्वे सुटणार नसल्याची माहिती मिळताच, नागरीक निराश झाले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पुण्याहून भर उन्हात पायी चालत आल्याने, सर्वांच्याच पोटात भुकेचा डोंब उसळला होता. तर कामगारांच्या सोबत असलेल्या महिला व लहान मुले अन्न व पाण्या अभावी रडवेली झाली होती. पोटात अन्नाचा कण व पिण्यास पाणी नाही अशा अवस्थेत पुन्हा पायी चालावे लागणार या विचारानेच कामगारांच्या पोटात गोळा उठला होता. यातून फक्त देवच वाचवू शकतो ही भावना प्रबळ होत असतानाच, लोणी काळभोर पोलिस वरील कामगारांच्या मदतीला देवासारखे धावून आले. 

उरुळी कांचन रेल्वे स्थानकाबाहेर परप्रांतीय कामगार जमा झाल्याची माहिती मिळताच, उरुळी कांचनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. रेल्वे स्थानकाबाहेर जाऊन पाहिले असता, कामगार, महिला व लहान मुले असे तीनशेहुन अधिक जण भुकेने व्याकुळ असल्याचे चौधरी यांना दिसुन आले. यावर चौधरी यांनी तात्काळ वरील सर्वांच्याच जेवणाची व्यवस्था करण्याची विनंती पोलिस कर्मचारी सोमनाथ चितारे व सचिन पवार यांना केली. सोमनाथ चितारे व सचिन पवार यांनी उरुळी कांचन येथील सागर पोपट कांचन व त्यांच्या सहकार्य़ांना फोन करुन वरील परीस्थितीची कल्पना दिली. यावर सागर कांचन व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ तीनशेहुन अधिक जनांच्या जेवणाची सोय केली. रुचकर व भरपेट जेवण मिळाल्याने कामगार व त्यांचे कुटुंबींय खुश झाले. 

परप्रांतीय कामगारांचे जेवण उरकताच, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी, सोमनाथ चितारे, सचिन पवार, उपसरपंच जितेंद्र बडेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन व त्यांचे सहकारी अर्जुण कांचन, राजेंद्र बाठे, संदीप गव्हाणे व सदाशिव भागेपल्ले यांनी स्वखर्चाने चार खाजगी वहाने बोलावून सव्वाशे कामगारांना पुण्यात पाठवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com