Youth killed in Pune : तरुणीची छेड काढल्याच्या वादातून मित्राचा खून
Youth Killed After Harassment Dispute : आंबेगावच्या जांभूळवाडीत तरुणीची छेड काढल्याच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठार मारल्याची घटना घडली असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Youth Murdered in Jambhulwadi Over Girl Harassmentesakal
पुणे : तरुणीची छेड काढल्याच्या वादातून एकाने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आंबेगाव परिसरातील जांभूळवाडी तलावाजवळ घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एकावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे.