crime
बारामती - किरकोळ वादावादीच्या प्रकारातून चिडून दोघांनी एका युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बारामतीत घडली. शहरातील लेंडीपट्टीजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात रविवारी (ता. १४) रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी यांनी दिली.