‘युवा मानसरंग’ कार्यशाळेतून आत्महत्या प्रतिबंधाचा संदेश

‘युवा मानसरंग’ कार्यशाळेतून 
आत्महत्या प्रतिबंधाचा संदेश
Published on

पुणे, ता. ११ ः परिवर्तन संस्थेअंतर्गत ‘यार्दी’ प्रकल्पाच्या माध्यमातून औंधमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दोन दिवसीय ‘युवा मानसरंग’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, भावना व अडचणी मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे तसेच गरजेच्या वेळी योग्य मदत घेण्याचे महत्त्व समजावून देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
डॉ. हमीद दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. संवादात्मक उपक्रम, गटचर्चा, सहभागात्मक कृती आणि विविध अनुभवाधारित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी मानसिक आरोग्याच्या विविध पैलूंवर संवाद साधण्यात आला. प्रशिक्षित संवादकांच्या माध्यमातून महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, मानसिक तणावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राथमिक भावनिक आधार देणे तसेच गरज भासल्यास त्यांना योग्य तज्ज्ञ सेवांशी जोडणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपाप्रसंगी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी परिवर्तन संस्थेच्या तज्ज्ञ समुपदेशक रेश्मा कचरे, पूजा भालेराव आणि ब्रह्मनाथ निळकंठ यांनी विद्यार्थ्यांशी मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध आणि भावनिक आधार याबाबत संवेदनशील संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com