esakal | भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Atul More

भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी - किरकटवाडी (Kirkitwadi) (ता. हवेली) येथे भर रस्त्यात एका तरुणाची (Youth) धारदार शस्त्राने वार करून हत्या (Murder) करण्यात आली आहे. अतुल सुरेश मोरे (वय 24 ,रा. किरकटवाडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Youth Murder in Kirkitwadi Crime)

हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 29 मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास किरकटवाडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाजवळ मयत अतुल मोरे व किरकटवाडी येथील विराज गबदुले आणि अविनाश करंजावणे (दोघांचेही वय अंदाजे 25 वर्ष) यांच्यात वाद झाला. त्यावेळी विराज व अविनाश या दोघांनी धारदार शस्त्राने अतुल वर वार केले. गंभीर जखमी झालेल्या अतुल मोरे यास खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: बंगल्यात जुगार खेळणाऱ्या 20 जणांवर कारवाई, दिड लाखांचा ऐवज जप्त

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व सहाय्यक फौजदार प्रदीप नांदे हे इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह किरकटवाडी येथे घटनास्थळी दाखल झाले असून हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.आरोपींना अटक केल्यानंतरच हत्यचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

loading image