टाकवे बुद्रुक येथे तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

- शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका तरुणाचा निर्घृण खून

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोर फरार झाले आहेत.      

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यश रोहिदास असवले (वय २२, रा.टाकवे बुद्रुक ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास यश हा जेवण झाल्यानंतर त्याच्या दोन मित्रांबरोबर घोणशेत रस्त्यावर फिरायला गेला होता. यावेळी तीन मोटारसायकलवर आलेल्या सात ते आठ जणांनी धारदार शस्त्रांनी यशच्या डोक्यावर व हातावर वार केले व ते फरार झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशला सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Youth Murder in Takave Budruk