पिंपरीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून 

संदीप घिसे  
रविवार, 21 एप्रिल 2019

एचए मैदानामध्ये एक मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. घटनास्थळाच्या बाजूला रक्ताने माखलेले दगडही दिसून आले.

पिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून त्यानंतर मृतदेह जाळून टाकत एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पिंपरीतील एच.ए. मैदान येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

एचए मैदानामध्ये एक मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. घटनास्थळाच्या बाजूला रक्ताने माखलेले दगडही दिसून आले.

डोक्यात दगड घालून या तरुणाचा प्रथम खून केला असावा आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मयत तरुणाच्या अंगावर जीन्स पॅन्ट असल्याचे दिसून आले .मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पिंपरी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: youth murdered in Pimpri