Police Commissioner Amitesh Kumar
sakal
पुणे - तरुणाईने व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली अंगीकारावी. तसेच अमली पदार्थांविरुद्धच्या या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शहर पोलिस दलातर्फे गुरुवारी (ता. १६) आयोजित सिक्युअर होरायझन फॉर युथ’ या अभियानांतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते.