esakal | होते तरुण म्हणून वाचली 500 एकराची वनसंपदा

बोलून बातमी शोधा

The youth saved five hundred acres of forest fire in Bakori area}

स्थानिक तरूणांनी दिलेल्या माहितीनुसार बकोरी, वाडेबोल्हाई, केसनंद परिसरातील डोंगरावर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी त्वरित वनपाल वायकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने या ठिकाणी येऊन आग अटोक्यात आणली. मात्र, सायंकाळी वाऱ्यामुळे या आगीने पुन्हा उग्र रुप धारण केले

होते तरुण म्हणून वाचली 500 एकराची वनसंपदा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केसनंद(पुणे) : केसनंद, वाडेबोल्हाई, बकोरी हद्दीतील शेकडो एकर डोंगर क्षेत्राला गुरुवारी (ता. २५) लागलेल्या आगीत वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. मात्र, माहिती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक तरूणांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे पाचशे एकर क्षेत्रातील वनसंपदा, छोटे वन्यजीव वाचविण्यात यश आले.

स्थानिक तरूणांनी दिलेल्या माहितीनुसार बकोरी, वाडेबोल्हाई, केसनंद परिसरातील डोंगरावर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागली. याबाबत माहिती मिळताच माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी त्वरित वनपाल वायकर यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने या ठिकाणी येऊन आग अटोक्यात आणली. मात्र, सायंकाळी वाऱ्यामुळे या आगीने पुन्हा उग्र रुप धारण केले.
चंद्रकांत वारघडे, धनराज वारघडे, धनश्री वारघडे, प्रसाद वारघडे, आकाश सागट, संकेत वारघडे आदींनी डोंगरावर जात सामुहिक प्रयत्नांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास बकोरीचे ग्रामपंचायत सदस्य शांताराम वारघडे, नवनाथ वारघडे हे देखील मदतीला धावून आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चंद्रकांत वारघडे यांनी आगीबाबत फेसबुकवर दिलेल्या माहितीमुळे वाघोली येथील शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जाधव, चैतन्य पवार, प्रकाश नागरवाड, अजित जाधव आदी तरुणही मदतीला आले. या सर्वांनी मिळून रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण आग अटोक्यात आणली. त्यामुळे डोंगरावरील हजारो झाडे, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांचे जीव वाचले. यामुळे या सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसत होता. दरम्यान, दोन दिवसापूर्वी लोणीकंद पॉवरहाऊस जवळच्या डोंगरालाही आग लागून वनक्षेत्राचे नुकसान झाले. पीएमआरडीएच्या वाघोली येथील अग्निशमन यंत्रणेने वेळीच आग अटोक्यात आणल्याने वनसंपदेचे व पर्यावरणाचे नुकसान टळले.

वनसंपदा व पर्यावरण जपण्यासाठी डोंगर उतारावर जाळपट्टे काढणे गरजेचे आहे. आगीच्या घटना न थांबल्यास प्रसंगी डोंगरावर जाणारा रस्ता बंद करावा लागेल.
-चंद्रकांत वारघडे, अध्यक्ष, माहिती सेवा समिती

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल


चार वर्षात चौदावेळा आगी
आतापर्यंत चार वर्षात चौदा वेळा परिसरातील डोंगराला लागलेल्या आगी या कार्यकर्त्यानी विझवल्या आहेत. बकोरी, केसनंदच्या डोंगरावर मौजमस्तीसाठी येणाऱ्या नशेबाजांमुळे आणि खेळण्यासाठी येणारे बाहेरील तरुणांमुळे या आगी लागत असाव्यात, असा स्थानकांचा अंदाज आहे.