कोंडगाव येथील युवकाची आत्महत्या; नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

कोंडगाव येथील शंकर उर्फ श्रावण सोपान दारवटकर याने खानापूर-पाबे -वेल्हे रस्त्यावरील रांजणे येथील एका फार्म हाऊस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

कोंडगाव येथील युवकाची आत्महत्या; नातेवाईकांची सखोल चौकशी करण्याची मागणी

वेल्हे, (पुणे) - कोंडगाव (ता. वेल्हे) येथील शंकर उर्फ श्रावण सोपान दारवटकर (वय - १७) याने खानापूर-पाबे -वेल्हे रस्त्यावरील रांजणे येथील एका फार्म हाऊस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे को़ंडगाव रांजणे भागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांनी सांगितले की, मयत शंकर उर्फ श्रावण याने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून शवविच्छेदनाच्या तपासणी अहवालानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल.

स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शंकर उर्फ श्रावण हा इयत्ता ११ वीत शिकत होता. तो दसऱ्याच्या सणासाठी कोंडगाव येथे आला होता. कुटुंबात तो एकुलता एक मुलगा होता. तो आई-वडिलांबरोबर आंबेगाव बुद्रुक येथे राहत होता.

गावी त्याचे आजी, आजोबा, चुलते राहतात. त्यांच्याकडे तो आला होता. काल गावातील त्याचा मित्र एकनाथ पांडुरंग आखाडे याच्या बरोबर शंकर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल बसून गेला. त्यानंतर तो घरी परत आला नाही.

टॅग्स :crimeYouthPolice Inquiry