सिव्हिल संक्षिप्त

सिव्हिल संक्षिप्त
Published on

लिंबोणीतील तरुणाचा
आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील लिंबोणीतील तरुणाने भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. राहुल विठ्ठल कोळी (वय १९) असे त्याचे नाव आहे. राहुल हा रविवारी रात्री नऊच्या सुमारास भंडारकवठे येथील राहत्या घरी होता. त्यावेळी त्याने अज्ञात कारणातून औषध प्राशन केले. यात त्याला त्रास होऊ लागल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास एकाने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो शुद्धीवर असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
---
मावा विक्रीवर बंदीचा
अर्ज देणाऱ्यास मारहाण
सोलापूर : मावा विक्रीस बंद घालावी, अशा मागणीचा अर्ज का केला म्हणून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावात घडली आहे. गावातील एसटी स्टॅंड परिसरात रविवारी दुपारी बसवराज अंदेनप्पा अंटद (वय ३२) यास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. त्याने गावात व परिसरातील मावा विक्रीवर बंदी करावी, असा अर्ज अधिकाऱ्यांकडे केला होता. याचा राग मनात धरून अशपाक अब्दुलकरीम डांगे व अल्ताफ डांगे यांनी बसवराजला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात बसवराजच्या दोन्ही पायास मार लागला असून, सर्वांगास मुकामार लागला आहे. तो स्वत: उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.
---
एसटीच्या धडकेत
ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
सोलापूर : धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील एसटी स्टॅंडबाहेर एसटी बसच्या धडकेत ८० वर्षीय आजीबाई गंभीर जखमी झाल्या. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला होता. रुक्मिणी विश्वनाथ माळी (रा. भूम, जि. धाराशिव) असे त्या महिलेचे नाव आहे. रुक्मिणी या एसटी स्टॅंडच्या गेटजवळून पायी जात होत्या. त्यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मागून भरधाव आलेल्या बसने त्यांना जोरात धडक दिली. यात रुक्मिणी यांच्या डाव्या पायाला आणि डाव्या हाताला, कपाळास जखम झाली होती. भूम येथील सरकारी रुग्णालयातून त्यांना पुढील उपचारासाठी मुलगा दत्तात्रय माळी यांनी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
---
मोहोळ स्टॅंडवर
तरुणाला मारहाण
सोलापूर : रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोहोळच्या एसटी स्टॅंडजवळ एका तरुणास लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. समीर शहाजहान बागवान (वय २०, रा. बागवान चौक, मोहोळ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. समीर हा रविवारी रात्री मोहोळच्या एसटी स्टॅंड परिसरात थांबला होता. त्यावेळी त्याला तौहिद तलफदार व इतर पाच जणांनी मारहाण केली. यात समीरच्या खांद्याला आणि सर्वांगास मार लागला. मोहोळच्या सरकारी रुग्णालयातून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
---
नीलमनगरात तरुणाची
गळफासाने आत्महत्या
सोलापूर : एमआयडीसी परिसरातील नीलम नगरात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सायंकाळी त्याने गळफास घेतला होता. विनायक बलराम रेब्बा (वय ३५) असे त्या तरुणाचे नाव आहे. विनायक रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी होता. त्यावेळी त्याने घरातील लाकडी वाशाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब समजताच एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्याला गळफासातून सोडवून बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com