
Bhima River
Sakal
पुणे : महाराष्ट्राची महत्त्वाची जलवाहिनी असलेल्या भीमा नदीचे वाढते प्रदूषण, पाण्याची घटती गुणवत्ता आणि ढासळलेली जैवविविधता यामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी आता भीमा खोऱ्यातील तरुणाई मैदानात उतरली आहे. जलबिरादरी, नदी की पाठशाला, महाराष्ट्र हाउसिंग सहकारी संस्था महासंघ, गोखले इन्स्टिट्यूट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नदीच्या संवर्धनासाठी ‘युथ ॲक्शन फॉर रिव्हर इनिशिएटिव्ह’ (यारी) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती ‘चला जाणूया नदीला’ अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य डॉ. सुमंत पांडे आणि जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.