विवाहपूर्व समुपदेशनाकडे वाढतोय तरुणाईचा कल

शिवानी खोरगडे
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पुणे - विवाह जुळवून आणण्यासाठी पूर्वी केवळ कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असायची. आता मात्र मुला-मुलींची मानसिकता, नोकरी, पगार हे सगळेच लक्षात घेतले जाते. तरीही अनेक विवाह अयशस्वी तर काहींमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहेत. यातूनच विवाहपूर्व समुपदेशनाकडे तरुणाईचा कल वाढला असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या निरीक्षणात आढळले आहे.

पुणे - विवाह जुळवून आणण्यासाठी पूर्वी केवळ कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असायची. आता मात्र मुला-मुलींची मानसिकता, नोकरी, पगार हे सगळेच लक्षात घेतले जाते. तरीही अनेक विवाह अयशस्वी तर काहींमध्ये तणाव निर्माण होताना दिसत आहेत. यातूनच विवाहपूर्व समुपदेशनाकडे तरुणाईचा कल वाढला असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या निरीक्षणात आढळले आहे.

लग्न ठरल्यानंतर आपल्यातील शारीरिक दोषावर योग्य उपचार घेण्याऐवजी झटपट उपचाराने तो कसा लपविता येईल, यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. शिवाय विवाहपूर्व काही वैद्यकीय चाचण्या करून घेणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी एचबी इलेक्‍ट्रो फोरेसिस ही चाचणी महत्त्वाची आहे. यातून ‘थॅलेसिमिया’ आणि ‘सिकलसेल’ यांची स्थिती समजते. थॅलेसिमियामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे सामान्य माणसांपेक्षा वेगळे असते. हे प्रमाण एकात असेल तर काही हरकत नाही; पण दोघांमध्ये असल्यास लग्न न करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अपत्याचे रक्त आयुष्यभर बदलत राहावे लागेल.

मुलींना लग्नात आपल्या त्वचेचा रंग उजळलेला पाहिजे असतो; पण त्वचेचा मूळ रंग बदलविण्याच्या उपचारपद्धती आर्थिकदृष्ट्या तर महागात पडतातच; पण त्यामुळे त्वचेचा पोत कायमचा घसरू शकतो. याबाबतही डॉक्‍टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.

का करताहेत समुपदेशन?
 शिक्षण आणि नोकरी संस्कृतीतील बदलाने मानसिक तणावात भर
 दैनंदिन गरजांमध्ये अनावश्‍यक गोष्टींचा आग्रह
 मॉडर्न संस्कृतीचा सरसकट अविचारी स्वीकार
 ‘बेस्ट टू बेस्टेस’च्या धावपळीत वाढलेली असमाधानी वृत्ती 
 सात्त्विक अन्न आणि विचार यांचे घटते ग्रहण

तरुणींमध्ये धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे अनेक शारीरिक आजार उद्‌भवतात. लग्न ठरलंय म्हणून धूम्रपान आणि अल्कोहोल सेवनामुळे उद्‌भवलेल्या समस्यांवर तात्पुरते उपचार घेण्यावर त्यांच्याकडून जास्त भर दिला जातो. या समस्या सासरच्यांकडून कशा लपविता येतील, यावर भर देणाऱ्या तरुणींची संख्या जास्त आहे. 
- डॉ. संजय गुप्ते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ संघटन

शारीरिक आजार हे सामान्य माणसाला काही प्रमाणात कळू शकतात; पण मानसिक आजार कळणे आणि तो समजून घेणे हे मात्र आवाक्‍याबाहेरचे आहे. ‘सायकॉटिक डिप्रेशन’ कळून येत नाही. त्यामुळे विवाहानंतर एकमेकांच्या मानसिक आजाराबद्दल समजल्यानंतर मतभेद, आत्महत्या, नाते तुटणे असे प्रकार घडतात. 
- डॉ. सविता देशपांडे, ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक 

Web Title: Youths trend is rising for pre marital counseling