बाबा चमत्कार फेम राघवेंद्र कडकोळ यांचे निधन

baba chamatkar fame raghvendra kadkol passes away
baba chamatkar fame raghvendra kadkol passes away

पुणे - झपाटलेला या चित्रपटातून बाबा चमत्कार ही भूमिका साकारणाऱे जेष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. झपाटलेला या चित्रपटामध्ये त्यांनी बाबा चमत्कारची भूमिका साकारताना तात्या विंचू या बाहुल्याला दिलेला ओम फट् स्वाहा हा मंत्र प्रचंड गाजला होता. झपाटलेला चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही ते दिसले होते. चित्रपट, नाटक, मालिका यात त्यांनी काम केलं होतं. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृषणधवल चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसंच नाटकांमध्ये त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यांच्यासोबतही काम केलं होतं. लहानपणी त्यांनी शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी नौदलात जाण्याची तयारीसुद्धा केली होती. तेव्हा भारताच्या आयएनएस विभागात ते एका पथकासोबत गेले होते. तेव्हा वैद्यकीय कारणांमुळे त्यांना बाहेर पडावं लागलं होतं. 

राघवेंद्र कडकोळ यांनी अश्रुंची झाली फुले, रायगडला जेव्हा जाग येते यांसारख्या नाटकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. नौदलात जाण्याचं स्वप्न अधुरं राहिल्यानंतर त्यांना धक्का बसला होता. तेव्हा खचून न जाता त्यांनी पुन्हा थांबलेलं शिक्षण सुरू केलं. त्यावेळी नाटकात काम करायला सुरुवात केली. तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नाटक करताना सतत बाहेर जावं लागायचं यामुळे नोकरी करणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी नोकरी सोडली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com