आता, ‘भय्या सामान जल्दी भेजो’ बंद! | Zepto Startup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kaivalya and aadit
आता, ‘भय्या सामान जल्दी भेजो’ बंद!

आता, ‘भय्या सामान जल्दी भेजो’ बंद!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - अचानक घरी कोणी पाहुणे येणार असतील किंवा वारंवार आठवण करूनही घरातील काही किराणा मालाच्या वस्तू आणायला आपण विसरतो. त्यामुळे बऱ्याचदा अशा वेळी धावत पळत किराणा आणल्याचे अनेकांच्या बाबतीत घडले असेल. सध्या अनेक किराणा व्यावसायिक होम डिलिव्हरी देत आहेत. पण ती वेळेत होईल की नाही, याची शाश्वती नसते. त्यामुळे दैनंदिन कामातून वेळ काढून आठवणीने सर्व किराणा आणणे हा अनेक नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी मोठा टास्क झाले आहे.

ऑर्डर केल्यानंतर अगदी ठरलेल्या वेळेत जसे फूड मिळते तसेच किराणा मिळेल, याची अशी अनेकांची इच्छा असते. ग्राहकांची ही इच्छा पूर्ण करणारे काही स्टार्टअप किंवा ॲप्लिकेशन्स सध्या अस्तित्वात आहेत. पण जर घरी बसल्या-बसल्या त्वरित किराणा मिळाला तर वेळ वाचतो. घराबाहेर पडून किराणा आणावा लागत नाही. तसेच सुपरमार्केट किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर तेथे असणारी गर्दी देखील टाळता येते, ही त्या मागची भावना असते. या सर्वांसाठी झेप्टो (Zepto) हे स्टार्टअप महत्त्वाचे ठरत आहे. किराणा मालाची ऑर्डर केल्यानंतर केवळ दहा मिनिटांत जवळच्या दुकानातून किराणा माल उपलब्ध करून देण्याची सुविधा हे स्टार्टअप पुरवते. क्लाऊड स्टोअरेज तंत्रज्ञानावर अवलंबून असलेले हे स्टार्टअप अल्पावधीतच अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. मुंबईमधील कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा यांनी या वर्षाच्या सुरवातीला हे स्टार्टअप सुरू केले. कोरोनानंतर किराणा आणि त्या अनुषंगाने असलेल्या व्यवसायातील संधीचा फायदा घेत नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी हे स्टार्टअप कार्यरत आहे.

हेही वाचा: पुण्यात जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय रुग्ण संख्येत वाढ

कोणत्याही सेवेचे जलद वितरण ग्राहकांना आवडते. ग्राहकांना सोप्या पद्धतीने जलद किराणा पोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही क्लाऊड स्टोरेज, मिनी वेअर हाऊस यासह विविध तांत्रिक बाबींचा वापर करतो. देशातील क्यू-कॉमर्स क्षेत्रात खूप मोठ्या संधी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक परिपूर्ण मॉडेल तयार करण्यात आम्ही मोठा वेळ घालवला. अनेक दिवस याबाबतचे संशोधन सुरू होते. सध्या आमच्या स्टार्टअपची दर महिन्याला २०० टक्क्याहून अधिक वाढ होत आहे. त्यामुळे आम्ही यशस्वी झाल्याचे यातून स्पष्ट होते व त्याचे आम्हाला समाधान आहे.

- कैवल्य वोहरा, आदित पालिचा, संस्थापक, झेप्टो

loading image
go to top