ZP School Jalindarnagar Worlds Best Awarded Rupees 1 Crore declare
sakal
पुणे - जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेचा जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत ‘समुदाय पसंती पुरस्कार’ (वर्ल्ड्स बेस्ट स्कूल - कम्युनिटी चॉइस अवॉर्ड) हा सन्मान पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर प्राथमिक शाळेला जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार जागतिक शैक्षणिक संस्था टी फोर एज्युकेशनकडून शाळेच्या नवकल्पना, सामाजिक प्रभाव आणि विद्यार्थी विकास या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येतो. हा एक कोटी रुपयांचा पुरस्कार १५ नोव्हेंबरला अबुधाबी येथे प्रदान केला जाणार आहे.