esakal | जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...
sakal

बोलून बातमी शोधा

School

चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेज १५ जूनपासून या शाळा ऑनलाइन सुरू करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाइन शाळा या ३१ जुलैपर्यंत असतील.

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा येत्या सोमवारपासून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन भरणार असल्या तरी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र ऑनलाईनच सुरू राहणार आहेत. झेडपीच्या शाळा सुरू करण्याचा अद्याप कसलाही आदेश जिल्हा परिषदेला आलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त होईपर्यंत झेडपीच्या सर्व शाळा ऑनलाइन असणार आहेत. 

आता घरबसल्या करा वारसनोंदी

चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेज १५ जूनपासून या शाळा ऑनलाइन सुरू करण्यात आलेल्या आहेत. ऑनलाइन शाळा या ३१ जुलैपर्यंत असतील. त्यानंतर या सर्व शाळा १ ऑगस्टपासून पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यात येतील, अशी घोषणा राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच केली होती. परंतू याच कालावधीत पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे या घोषणेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. 

पूर्व नियोजनानुसार पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा १ जुलैपासून सुरू करण्यात येणार होत्या. यानुसार नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे त्याही सुरू होऊ शकल्या नव्हत्या. 

Positive Story: पुण्यात विकसित होतेय 'हर्ड इम्युनिटी'; जाणून घ्या कशी करते काम

जिल्हा परिषद शाळांचा दुसरा टप्पा हा १ सप्टेंबरला सुरू करुन, या दुसऱ्या टप्प्यात इयत्ता तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र या नियोजनानुसार जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप सुरू होऊ शकलेल्या नाहीत. 

दरम्यान, राज्य सरकारने येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा नियमित सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पुणे जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. मात्र पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या प्राथमिक आहेत. पुणे जिल्हा परिषदेची एकही माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा या ऑनलाइनच भरणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले. 

फडणवीसांनी आत्तापासूनच उठाबशा काढल्या तर निदान थोडीफार मजल गाठता येईल : जयंत पाटील​

जिल्हा परिषद शाळा स्थिती :

- जिल्ह्यातील एकूण शाळा - ३ हजार ७१५.

- सातवीपर्यंत वर्ग असलेल्या - ७९८.

- आठवीपर्यंत वर्ग असलेल्या - ४७.

-  पाचवीपर्यंत वर्ग असलेल्या - २ हजार ८७०.

- नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा - एकही नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image