
पुणे : हिंजवडी, माण भागात सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने पाऊल टाकले असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येणार आहेत. माण ग्रामपंचायत भागात चार एमएलडी क्षमेतचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. त्याचबरोबर माणसह इतर गावांमध्ये घनकचरा प्रकल्प करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) जागेची मागणी केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.