पुणे : झेडपी अध्यक्ष निवडणुकीवरून वाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

अर्ज दाखल करण्याचे ठिकाण ऐनवेळी बदलले असल्याने आता निवडणुकीत वाद निर्माण झाला आहे.  

पुणे : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठिकाण ऐनवेळी बदलले. त्यामुळे विरोधकांना उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा - पालकमंत्रीपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांची गुगली 

आज दुपारी दोन वाजता निवडणूक स्थगित करण्याची मागणी ज्येष्ठ सदस्य आशा बुचके यांनी राम यांच्याकडे केली आहे. यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या आजच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुखाची हकालपट्टी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP president disputes election in pune