‘झेडपी’च्या शाळांची घंटा वाजणार १ ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले, तरी जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र येत्या १ ऑगस्टपासून भरणार आहेत. जिल्हा परिषद शाळांचा हा पहिला टप्पा असेल. यात केवळ इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग भरणार आहेत. जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळा मात्र १ जुलैपासून सुरू होणार आहेत. या शाळांचे केवळ नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होतील.

पुणे - शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले असले, तरी जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र येत्या १ ऑगस्टपासून भरणार आहेत. जिल्हा परिषद शाळांचा हा पहिला टप्पा असेल. यात केवळ इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग भरणार आहेत. जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळा मात्र १ जुलैपासून सुरू होणार आहेत. या शाळांचे केवळ नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जिल्हा परिषद शाळांचा दुसरा टप्पा १ सप्टेंबरला सुरू होणार आहे. यात तिसरी ते पाचवीचे वर्ग सुरू होतील. त्यामुळे या वर्गांतील विद्यार्थ्यांना आणखी किमान अडीच महिने गृहअध्ययन करावे लागणार आहे. पहिली, दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची शाळा भरण्याची तारीख राज्य सरकारने अद्याप निश्‍चित केलेली नाही. सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत पहिली, दुसरीचे वर्ग बंद राहणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी मंगळवारी सांगितले.

पुण्यातील 'या' भागात तीन दिवस संचारबंदी

शाळा सुरू करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये शाळा भरविण्यासाठीचे वर्गनिहाय तीन टप्पे केले आहेत, असेही कुऱ्हाडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zp school started from 1st august