Teacher Recruitment : झेडपीच्या शाळांना मिळणार ४३६ शिक्षक; पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
pune zp

pune zp

sakal

Updated on

पुणे - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध झाले असून, समुपदेशन आणि कागदपत्र पडताळणीनंतर त्यांची रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. हे शिक्षक येत्या १० सप्टेंबरपर्यंत शाळांमध्ये रुजू होणार असल्याने शिक्षक उपलब्धतेचे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com