पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आप'चे 13 डॉक्टर झाले 'आमदार' I Aam Aadmi Party | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Assembly Election

ऐतिहासिक विजय मिळवणारा 'आम आदमी पक्ष' देशातील तिसरा पक्ष बनलाय.

पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच 'आप'चे 13 डॉक्टर झाले 'आमदार'

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Assembly Election) 117 विधानसभा जागांपैकी 92 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवणारा 'आम आदमी पक्ष' (Aam Aadmi Party) देशातील तिसरा पक्ष बनलाय. आपचं आता दोन राज्यात सरकार आहे. आम आदमी पक्षानं दावा केलाय की, त्यांचे आमदार सर्व विभागातून निवडून आले आहेत. या समर्थनार्थ दिल्लीचे आप नेते आणि आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Kumar Jain) यांनी पंजाबमध्ये पहिल्यांदाच 13 डॉक्टर आमदार निवडून आले आहेत, असं सांगितलंय. दरम्यान, आम आदमी पक्षानं पंजाबात 117 पैकी 92 जागा जिंकल्या आहेत.

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनी ट्विट केलंय की, भारतात राजकीय इतिहास रचला गेलाय. कारण, पंजाबमध्ये पहिल्यांदाच 13 डॉक्टर आम आदमी पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. सत्येंद्र जैन यांनी पंजाब विधानसभेवर निवडून आलेल्या डॉक्टरांची यादीही प्रसिध्द केलीय. आमदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टरांमध्ये बंगातून सुखविंदर कुमार सुखी, चब्बेवालमधून राजकुमार चब्बेवाल, तरनतारनमधून काश्मीर सिंह सोहल, शाम काहुरासीमधून रवज्योत सिंह, चमकौर साहिबमधून चरणजीत सिंह, नवांशहरमधून नछतर पाल, अमृतसर दक्षिणमधून इंदरबीर निज्जर आणि इतरांचा समावेश आहे.

हेही वाचा: 'आप' राष्ट्रीय पक्ष होणार? पक्षाला करावी लागणार आयोगाची 'ही' अट पूर्ण

विशेष म्हणजे, पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भगवंत मान हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचं ऐतिहासिक निकालावरून स्पष्ट झालंय. काल भगवंत मान यांनी दिल्लीत येऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची भेट घेतली. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, शहीद-ए-आझम भगतसिंग (Shaheed-e-Azam Bhagat Singh) यांच्या कुटुंबाची भूमी असलेल्या खटकर कलान येथे 16 मार्च रोजी भगवंत मान (Bhagwant Mann) शपथ घेणार आहेत. तसेच माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं 117 पैकी 92 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवलाय, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना 18 जागा मिळाल्या आहेत.

Web Title: 13 Mlas Elected From Aam Aadmi Party In Punjab Assembly Elections Are Doctors Satyendra Kumar Jain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top