
'आपलं राज्य आर्थिक समस्यांना तोंड देत आहे आणि आपण त्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा.'
'आप'च्या आमदारानं शब्द पाळला; एक रुपया पगार घेणार, पेन्शनही सोडली
चंदीगड : अमरगडमधील 'आप'चे (Amargarh Constituency) आमदार जसवंत सिंह हे (AAP MLA Jaswant Singh) लोकोपयोगी कार्यासाठी ओळखले जातात. जसवंत यांना त्यांच्या मतदारसंघात आरोग्य, शिक्षण आणि इतर सुविधांमध्ये त्वरित सुधारणा हवीय. येत्या काही महिन्यांत जलद कृती आणि बदल दिसण्याची अपेक्षा आहे. यासह त्यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दिलेलं पहिलं आश्वासनही पूर्ण केलंय. जसवंत सिंह यांनी फक्त एक रुपया पगार घ्यायचा आणि पेन्शन सोडण्याचा निर्णय घेतलाय.
जसवंत सिंह म्हणाले, जेव्हा मला तिकीट मिळालं तेव्हा मी जाहीर केलं होतं की, मी फक्त 1 रुपया पगार घेईन आणि पेन्शन (Pension) घेणार नाही. आपलं राज्य आधीच आर्थिक समस्यांना तोंड देत आहे आणि आपण त्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. आमदार पुढे म्हणाले, मी व्यवसाय आणि सामाजिक कार्याशी निगडित असल्यानं मी सर्व लोकांसाठी सहज उपलब्ध आहे. माझ्या बहुतांश मतदारांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. कारण, मी त्या मतदारसंघातील आहे. आमच्या सरकारनं पहिल्या दिवसापासून काम सुरू केलंय. जसवंत सिंह यांना 44,523 मतं मिळाली होती, तर एसएडी (ए) उमेदवार सिमरनजीत सिंह मान यांना 38,480 मतं मिळाली आहेत.
हेही वाचा: RSS : 'एक दिवस सर्व मुस्लिम-ख्रिश्चन RSS मध्ये सामील होतील'
मतदारांना दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आपण गंभीर आहोत. निवडणूक (Punjab Assembly Election) प्रचारादरम्यान आम्ही मतदारांना मोठी आश्वासनं दिली नाहीत. जसवंत सिंह यांनी केवळ तीच आश्वासनं दिली, जी पूर्ण करता येतील. मी राजकारणात मतदारांची सेवा करण्यासाठी आलोय. मतदारांना मूर्ख बनवणाऱ्या इतर पक्षांच्या उमेदवारांसारखा मी नाहीय, असंही जसवंत म्हणाले. आमच्या सरकारनं पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं असून प्रत्येकाला काही दिवसांत बदल दिसेल, असंही त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.
Web Title: Aap Mla Jaswant Singh Fulfills His Promise Will Take One Rupee Salary Leave Pension Punjab Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..