केजरीवालांनी भगतसिंगांसोबत केली स्वत:ची तुलना; राजकारण तापलं

arvind kejriwal
arvind kejriwalesakal

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केरजीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज शुक्रवारी केलेलं ट्विट वादात सापडलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:ची तुलना भगतसिंगांशी (Bhagat Singh) केली असल्याचा आरोप त्यांच्यावर होतो आहे. त्यांचे आधीचे सहकारी राहिलेल्या कुमार विश्वास यांनी त्यांच्यावर दहशतवाद्यांशी जवळीक असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं होतं. (Aam Aadmi Party)

arvind kejriwal
स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मुंबईचे मोठे योगदान; मोदींनी केले कौतुक

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे यासंदर्भात तपासाची मागणी केली आहे. केजरीवाल यांचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का, हे तपासण्यात यावं, अशी त्यांनी मागणी केली आहे.

दुसरीकेड आज केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलंय की, हे सगळे भ्रष्टाचारी मला दहशतवादी म्हणत आहेत. मी जगातला पहिला असा दहशतवादी आहे जो लोकांसाठी शाळा बनवतो, हॉस्पिटल्स उघडतो आणि वीज कनेक्शन ठीक करतो. मी जगातला पहिला 'स्वीट दहशतवादी' आहे. ब्रिटीश भगतसिंगाला घाबरत होते. म्हणून ते त्यांना दहशतवादी म्हणत होते. मी भगतसिंगांचा चेला आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

त्यांच्या या ट्विटनंतर काँग्रेस, भाजपसहित अनेक राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. केजरीवाल हे स्वत:ची तुलना भगतसिंगांशी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेता गौतम गंभीर यांनी ट्विट करत म्हटलंय की, भगतसिंगाने आपलं आयुष्य या देशासाठी समर्पित केलं आहे. त्याने स्वत:च्या शरीराचे तुकडे होऊ दिले मात्र, त्याने देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. सत्तेसाठी त्याचं नाव वापरणं लज्जास्पद आहे.

arvind kejriwal
रिव्हेंज इन्फेक्शन! घटस्फोट दिल्याच्या रागातून HIV झालेल्या नवऱ्याने ठेवले असुरक्षित संबंध

पंजाब काँग्रेसनेही त्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटलंय की, अरविंद केजरीवालांनी स्वत:ची तुलना भगतसिंगांशी करण्यावर आम्ही आक्षेप नोंदवत आहोत. हा राष्ट्रीय नायकाचा अनादर आहे. केजरीवाल यांनी ड्रग्जच्या व्यापारातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या मजिठियाची माफी मागितली होती. मतांसाठी त्यांनी पंजाबविरोधी असलेल्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी केली आहे. शहिद भगतसिंगांसोबत स्वत:ची तुलना करणे हा राष्ट्रीय नायकाचा अनादर आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही यावर टीका केली असून त्यांनी म्हटलंय की, कृपा करुन तुमच्या राजकारणासाठी शहिद भगतसिंगांसारख्या भारतमातेच्या धाडसी सुपुत्रासोबत तुलना करु नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com