'पंजाबला केंद्राचा पूर्ण पाठिंबा', PM मोदींच्या आश्वासनानंतर केजरीवालांनी मानले आभार | Arvind Kejriwal Thanks PM Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal Thanks PM Modi

'पंजाबला केंद्राचा पूर्ण पाठिंबा', PM मोदींच्या आश्वासनानंतर केजरीवालांनी मानले आभार

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये (AAP Victory Punjab) दमदार विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसला मागे टाकता ९० पेक्षा अधिक जागा मिळविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील विजयासाठी अरविंद केजरीवालांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आज केजरीवालांनी मोदींचे आभार मानले.

काय म्हणाले मोदी? -

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळविला आहे. त्यासाठी या पक्षाला शुभेच्छा, असं मोदी म्हणाले. बिगर भाजपशासित राज्याला केंद्रातून निधी मिळत नाही, तसेच या राज्यांना वारंवार डावलण्यात येतं, असे आरोप होतात. पण, पंजाबमध्ये काँग्रेसला मागे टाकत आपने विजय मिळविताच पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या विकासासाठी केंद्राकडून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर केजरीवालांनी मोदींचे आभार मानले.

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा पंजाब विधानसभा निवडणुकीची झाली. कारण, पंजाबमध्ये आपने जोरदार मुसंडी मारली. २०१७ च्या निवडणुकीत अवघ्या १३ जागा मिळविलेल्या आपने २०२२ च्या निवडणुकीत ९० पेक्षा अधिक जागा मिळविल्या. तसेच काँग्रेसचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच दिल्लीनंतर कुठल्यातरी राज्यात सत्ता मिळविली आहे. तसेच दिल्लीपेक्षा पंजाब मोठं आहे. त्यामुळे आपचा विजय अधिक महत्वपूर्ण मानला जात आहे.

पंजाबमध्ये जवळपास ३२ टक्के दलित मतदार आहेत. त्यामुळेच काँग्रेसने दलित मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देऊन प्रयोग केला. पण, काँग्रेसचा प्रयोग फसला. त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा चरणजीतसिंह चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला. इतकेच नाहीतर पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांचा देखील पराभव झाला. आपचे भगवंत मान यांना पंजाबच्या जनतेने पसंती दिली.

Web Title: Arvind Kejriwal Thanks Pm Modi Aap Punjab Victory And Support

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Punjab
go to top