केजरीवालांनी एकदा म्हणावं की मी खलिस्तानविरोधी आहे: कुमार विश्वास

Arvind Kejriwal - Kumar VIshwas
Arvind Kejriwal - Kumar VIshwasTeam esakal
Updated on

नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरलेले असताना आता आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांचा खलिस्तान्यांशी असलेल्या संबंधाबाबतचा आरोप अधिक तीव्र होताना दिसत आहे. त्यांचे पूर्वीचे सहकारी राहिलेले कुमार विश्वास यांनीच हा आरोप अत्यंत ठामपणे केला आहे. मात्र, केजरीवाल यांनी हे आरोप धुडकावून लावले आहेत.

ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांनी त्यांच्या दाव्याला दिलेल्या प्रत्युत्तराला पुन्हा उत्तर दिलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांना आव्हान करत म्हटलंय की, केजरीवाल यांनी समोरासमोर मंचावर यावं आणि खलिस्तानविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी.

काय म्हणाले कुमार विश्वास?

केजरीवाल यांची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे आत्मविश्वासाने खोटं बोलणं आणि दुसरं म्हणजे स्वत:ला पीडित दाखवून इतर सर्वजण कसे त्यांच्याविरोधात उभे राहिले आहेत, असं दाखवणं. या दोन पद्धतीतून त्यांनी एकदा संपूर्ण देशाला फसवलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही फसवलं आहे, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला आहे.

कुणीही तुम्हाला दहशतवादी म्हणत नाहीये. फक्त तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. गेल्या निवडणुकीआधी दहशतवादी संघटनेचे सहानुभूतीदार तुमच्या घरी येत होते किंवा नाही? जेंव्हा मी याबाबत आक्षेप घेतला तेंव्हा मला पंजाबसंदर्भातील बैठकीतून काढून टाकण्यात आलं. मी या बैठका तर रेड-हँड पकडल्या आहेत. या बैठकीच्या बाहेर एक सुरक्षारक्षकही होता ज्याने मला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, जेंव्हा मी आत घुसून पाहिलं तेंव्हा मला तेच लोक त्या बैठकीत दिसले आणि मला केजरीवालांकडून असं सांगण्यात आलं की, यांच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होईल.

ते आता म्हणत आहेत की, राहुल गांधी आणि मोदीजी एकच धून गात आहेत. ते एकमेकांच्या विरोधात असले तरीही ते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर एकसारखीच भूमिका घेतात., असंही कुमार विश्वास यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com