Punjab Election : सिद्धू म्हणतात, 'माझे उत्पन्न 20 वर्षांपासून 30 कोटी होते, आता..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

सिद्धू म्हणतात, 'माझे उत्पन्न 20 वर्षांपासून 30 कोटी होते, आता..'

सध्या पंजाब विधानसभा निवडणूकीची रणधूमाळी सुरु असुन अमृतसर पूर्व विधानसभेतील काँग्रेस(Congress) चे उमेदवार नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी त्यांचे महिन्याचे उत्पन्न जाहीर केलं. ते म्हणाले की, 20 वर्षांपासून त्यांचे उत्पन्न 30 कोटी रुपये प्रति महिना होते, ते आता कमी होऊन 70 हजार रुपये प्रति महिना झाले आहे. यापुढे बोलताना सिद्धू म्हणाले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारखा मुखवटा घातलेला माणूस आजपर्यंत पाहिला नाही. ते राज्याच्या पूर्व भागात निवडणूक प्रचारासाठी आले होते.

नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, आपला प्रत्येक धर्म दिशा देतो पण राजकीय व्यवस्थेत काही स्वार्थी लोक धर्माच्या नावाखाली राजकारण करताना दिसतात. विटंबना प्रकरणावर अनेकांनी राजकारण केले. जे लोक बाबा नानकांना मानतात ते सर्वांच्या भल्यातच आपले भले पाहतात. त्यामुळे पंजाबच्या हिताची चर्चा करणाऱ्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

हेही वाचा: भाजपच्या बेटी बचाव घोषणेवर प्रश्नचिन्ह! वर्षा गायकवाड म्हणाल्या की..

माफिया आणि गुंडागर्दी करणाऱ्यांना पराभूत करायचे असेल तर विचार करून मतदान करा, असे ते म्हणाले. सिद्धूने सांगितले की, पूर्वी त्यांची कमाई 30 कोटी रुपये होती पण लाफ्टर चॅलेंज शो सोडल्यानंतर त्याचे उत्पन्न 70 हजार रुपयांवर आले आहे. यावेळी सिद्धू यांना चरणजीत सिंह चन्नी यांच्या श्रीमंतीबद्दल प्रश्न विचारला असता, या प्रश्नाचे उत्तर फक्त चन्नीच देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: उभ्या गाड्यांनाही आगीचा धोका! Hyundai, Kia ने लाखो कार मागवल्या परत

Web Title: Punjab Election 2022 Navjot Singh Sidhu Disclosed About His Income Says

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top